जाणून घ्या !! सोमवती महावर बद्दल ज्यांचा विडिओ मुंबई पोलिसांनी वापरला

आपल्या मजेदार अंदाजामध्ये सर्वांना चहा प्या म्हणून आमंत्रण देणारी महिला आता विदेशात सुद्धा फेमस होत आहे. youtube वर ‘चाय पीलो फ्रैंड्स’ या नावाने व्हायरल झालेला विडिओ ने इंटरनेट वर धमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण आपल्या परीने ह्या विडिओ चे memes बनवून इंटरनेट वर शेयर करत आहेत. या महिलेचे नाव सोमवती महावर असे आहे.

भारत मध्ये धमाकूळ घातल्या नंतर सोमवती महावर या महिलेचे विडिओ विदेशात सुद्धा प्रसिद्ध होत आहे. काही दिवसापूर्वी एक विडिओ समोर आला ज्यामध्ये एक विदेशातील पुरुष सोमवती महावर याच्या अंदाजामध्ये ‘चाय पीलो’ असे बोलताना दिसत आहे. तो खूप व्हायरल होत आहे.

हे वाचा :- इंटरनेट वर खळबळ निर्माण करणाऱ्या प्रिया वारिअरचा नवीन विडिओ.

 

सोमवती महावर कशी फेमस झाली ??

सोमवती महावर या महिलेने एक १५ सेकंदाचा विडिओ बनवला होता ज्या मध्ये ती ‘हेलो फ्रैंड्स चाय पीलो’ असे म्हणून लोकांना चहा पिण्यासाठी आमंत्रण देत आहे. या विडिओ ने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. हा विडिओ सोशल मीडिया वर येताच सर्वजण हा विडिओ शेयर करू लागले आणि सोमवती महावर फेमस झाली. त्या नंतर त्यांनी एका नंतर एक खूप विडिओ बनवले कधी खीर खाताना तर कधी भाजी कापताना.

मुंबई पुलिस ने सुद्धा विडिओ वापरला  !

मुंबई पुलिस ने त्यांच्या विडिओ चांगलाच उपयोग करून घेतला. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस ने एक विडिओ जारी केला होता. ज्यामध्ये त्यांनी एकदम मजेशीर अंदाजामध्ये लोकांना गाडी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी आग्रह केला आहे. मुंबई पोलिसांनी सोमवती महावर याच्या विडिओ ला ‘चाय पी लो’ च्या जागी हेलमेट पहन लो’ असा एडिट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares