आता गुगल सांगणार कि बीमार व्यक्ती किती दिवस जगणार !!

जग चमत्कारांनी भरलेले आहे परंतु यावेळी चमत्कार हा तंत्रज्ञानाचा आहे. गुगल एका अशा तंत्रज्ञानासह येत आहे जे तंत्रज्ञान सांगू शकेल की बीमार व्यक्ती कधी मरणार आहे. गुगल ने या प्रकरणाचा शोध घेतला आहे.

संशोधन करण्यासाठी एका महिलेचा शोध घेतला गेला जी महिला स्तन कर्करोगाने (Breast cancer ) ग्रस्त होती. डॉक्टरांच्या एका टीम ने त्या महिलेचा रेडिओलॉजी स्कॅन केला. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की एका महिलेचा मृत्यूचा दर 9.३ टक्के आहे .परंतु जेव्हा गुगल अॅपला विचारले असता, त्या महिलेचा मृत्यूचा दर 19 .9 टक्के दाखवला, आणि काही दिवसांनी ती स्त्री मरण पावली.

हे वाचा :- जाणून घ्या !! सोमवती महावर बद्दल ज्यांचा विडिओ मुंबई पोलिसांनी वापरला

या महिलेवर झालेल्या संशोधना बद्दल गुगल नी सांगितले कि त्यांनी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्यामुळे लोकांच्या मृत्यू विषयी ची माहिती मिळेल. एखाद्या व्यक्तीची जिवंत राहण्याची शक्यता किती टक्के आहे हे शोधण्यासाठी हा अॅप सक्षम असेल. या अॅपची खासियत हि आहे की ते सांगू शकेल कि एखादी व्यक्ती रुग्णालयात किती दिवस जिवंत राहू शकते.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी असोसिएट प्रोफेसर निगम शाह म्हणाले की हे मॉडेल अंदाजे आहे परंतु ते अचूक असावे यावर काम चालू आहे, तसेच डॉक्टर बर्याच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक आरोग्य रेकॉर्डवर संशोधन करीत आहेत. गुगल च्या संशोधकांनी आणखी एक एल्गोरिदम विकसित केले आहे जे डोळ्याच्या रेटिना चे स्कॅनचे विश्लेषण करून हृदयविकाराच्या झटक्या बद्दल माहिती देऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares