जाणून घ्या ! या प्लास्टिक उत्पादनांवर बंदी राहणार नाही

प्लास्टिकच्या वापरामुळे वाढते प्रदूषण आणि पर्यावणाची हानी होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्लास्टिकच्या वापरास पूर्णपणे मनाई केली आहे. हा नवीन नियम शनिवार पासून लागू केला गेला आहे. पहिल्या दिवशी प्रशासनाने व्यापारी आणि दुकानदारांवर कार्यवाही करत 8,15,000 रुपये दंड ठोठावला, ज्या मध्ये 163 लोकांवर कार्यवाही केली गेली जे प्लास्टिकचा वापर करीत होते.

सर्वाधिक कारवाई नाशिकमध्ये झाली. येथे 72 लोकांविरूद्ध कारवाई करीत प्रशासनाने 3,60,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुण्यातही 52 जणांना दंड ठोठावत प्रशासनाने 2,60,000 रुपये वसूल केले. याशिवाय, उल्हासनगरमधील 20 लोकं आणि ठाणे जिल्ह्यातील 19 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

हे वाचा :-आता गुगल सांगणार कि बीमार व्यक्ती किती दिवस जगणार !!

प्रशासनाच्या या कठोर निर्णयामुळे व्यापारी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि पॅकेजिंग आणि काही अन्य उत्पादनावर प्लास्टिकच्या वापरावर सूट देण्यात यावी. पण, बॉम्बे हायकोर्टाच्या वतीने कुठल्याच प्रकारचा दिलासा देण्यात आला नाही.

23 मार्च रोजी प्लॅस्टिकवर बंदी घालण्याची अधिसूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. पण शासनाच्या या अधिसूचनाला न्यायालयात आव्हान देत यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे मूलभूत अधिकाराचे कायदेशीर उल्लंघन असल्याचे आरोप करण्यात आले आहे. सध्या सुनावणी चालू आहे.

तीन वेळा पकडल्या गेल्यास होणार तुरुंगवास

महाराष्ट्र शासनाने या कायद्याचे अत्यंत कठोरपणे पालन केले आहे. 5 हजार ते 25 हजार रुपयांचा दंड अशी तरतूद आहे. या नव्या कायद्यानुसार, जर कोणी पहिल्यांदा पकडले गेले तर त्याला प्लास्टिकची निर्मिती, उत्पादन व साठवण केल्यामुळे पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्या वेळेस , त्याच्या कडून 10,000 रुपये दंड आकारला जाईल आणि तिसर्यावेळेस त्या व्यक्तीकडून 25 हजार रुपये दंड आकारला जाईल आणि 3 महिने तुरुंगवास भोगावा लागेल.

या प्लास्टिक उत्पादनांवर राहणार बंदी

सरकारने प्लास्टिकचे बनवलेले अनेक प्रकारच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. यामध्ये 50 मायक्रॉन पेक्षा कमी पॉलीथिलीनचा समावेश आहे. एकवेळेस वापरण्यात येणारी (Use and throw) प्लॅस्टिक प्लेट, भांडी, चमचे, वाट्या, चष्मा, डब्बे, चहाचे कप आणि थर्मोकोल. या व्यतिरिक्त, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये पार्सल देण्यात येण्याऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.

या प्लास्टिक उत्पादनांवर बंदी राहणार नाही

सरकारने काही आवश्यक उत्पादनांमधील प्लॅस्टिकचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. त्यामध्ये प्लास्टिक पिशवी, औषध पॅकेट, बाटल्या, रुग्णालयात वापरण्यात येणारे प्लास्टिक उपकरणे बिस्किटे, प्लास्टिक wrappers चिप्स आणि स्नॅक्स, 50 पेक्षा जास्त मायक्रॉन दूध पिशवी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, टीव्ही-फ्रिज-संगणक यासारख्या वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा समावेश केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares