पूर्ण वाचा !अमेझॉन चे संस्थापक पुण्याच्या इंजिनियर मुळे झाले गरीब

ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन चे संस्थापक जेफ बेबोझ हे बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून मान मिळवला होता. हे अमेझॉनच्या शेअरच्या किमती मध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे झाले होते, परंतु हा आनंद त्यांच्यासाठी फार काळ टिकू शकला नाही कारण काही तासांनंतर शेअरच्या किमती कमी झाल्या आणि जेफ बेबोझ परत दुसऱ्या क्रमांकावर परत आले.

जेफ बेबोझ यांच्या नंबर एक वरून ते नंबर दोन पर्यंतच्या प्रवासादरम्यान, पुण्यातील एका तरुणाला प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर फेबिन बेंजामिन यांनी अमेझॉन इंडियाच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली आणि विचारले कि “जेफ बेबोझ यांच्या नंबर एक वरून ते नंबर दोन वर जाण्यामागे मी तर जवाबदार नाही ना” ?

हे वाचा :-दिल्ली मध्ये एकाच घरात मिळाले ११ मृतदेह !!!

फेबिन यांनी लिहिले कि – अमेझॉन , मी आपल्या साइटवरून एक प्रॉडक्ट ऑर्डर केले होते आणि मला ताबडतोब हि बातमी कळाली की जेफ बेबोझ यांनी जगातील सर्वात श्रीमंत माणूस होण्याचा मान मिळवला आहे. काही वेळाने माझे मन बदलले आणि मी माझी ऑर्डर रद्द केली आणि लगेचच जेफ बेबोझ हे पहिल्या क्रमांका वरून दुसऱ्या क्रमांका वर आले हि बातमी कळाली. हे सर्व मी ऑर्डर रद्द केल्यामुळे तर घडले नाही ना हे तुम्ही मला कळवावे?

फेबिन बेंजामिन यांनी फेसबुक वर केलेली पोस्ट
फेबिन बेंजामिन यांनी फेसबुक वर केलेली पोस्ट

फेबिन यांनी ही पोस्ट सोशल मीडिया वर शेअर केली होती आणि आतापर्यंत सुमारे 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे आणि सुमारे 5000 वेळा ते शेअर केले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares